आसावरी आणि अभिजीत राजेंची प्रेमकहाणी बहरणार कोकणात !
‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. एका वेगळ्या आणि हटके वळणावरची प्रेमकहाणीला प्रेक्षकांनीही अगदी भरभरून प्रतिसाद दिला . आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी झटणा-या सासुबाईंना त्यांच्या उतारवयात हक्काचा जोडीदार मिळवून देण्याच घाट सूनबाईने घातलाय तर दुसरीकडे अभिजीत राजेंनीही आपलं प्रेम आसावरीपुढे व्यक्त केलं आहे. यावर आसावरी कोणता निर्णय घेते याची सर्वांना उत्सुकता लागुन राहिली असतानाच मात्र एक ना अनेक विघ्न समोर येऊ लागली आहेत.
त्यातलं पहिल विघ्न म्हणजे आईच्या आणि अभिजीत राजेंच्या प्रेमाबद्दल सोहमला सर्व समजतं. आई यात गुंतू नये म्हणून सोहम एक कठोर निर्णय घेतो. कथानकाप्रमाणे सोहम हा आईला त्यांच्या गावी आकेरीला म्हणजे कोकणात पाठवण्याचं ठरवतो. मात्र या प्रवासात आसावरची चुकामुक होते की आणखील काही घडत हे पाहणं आता जास्तचं इंटरेस्टिंग असणार आहे. पण एकंदरीतच या चुकामुकीत आसावरी आणि अभिजीत राजेंची पुढची प्रेमकहाणी कोकणात बहरलेली लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार हे नक्की.
हा विशेष भाग चित्रित करण्यासाठी मालिकेच्या सर्व टिमने गेली काही दिवस सावंतवाडीतील आकेरी गावात तळ ठोकला. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे कोकणातील आकेरी गावातच सध्या सुरु आहे. त्यात आता ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचे काही भाग तिथे चित्रित होणार आहे. त्यामुळे कोकणताील निसर्गसौंदर्यासह या मालिकेचे पुढील रंजक भाग पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. तसेच या मालिकेत येणारे नवनविन ट्विस्टही लोकांना वेड लावतील यात काहीच शंका नाही.