अर्जुन रामपालचे 26 वर्षीय मॉडेलबरोबर अफेअर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/arjun-rampal-natasha-.jpg)
अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया गेल्या तीन महिन्यांपासून विभक्त झाले आहेत. मात्र याच दरम्यान अर्जुन रामपाल 26 वर्षीय मॉडेलबरोबरच्या अफेअरमुळे चर्चेत आला आहे. नताशा स्केन्कोविच नावाची ही मॉडेल, ऍक्ट्रेस गेल्यावर्षी अर्जुनच्या “डॅडी’ मध्येही होती.
“डॅडी’तील एका गाण्यामध्येच तिला काम मिळाले होते. अर्जुन आणि नताशा या दोघांमध्ये तब्बल 19 वर्षांचे अंतर आहे. मात्र तेंव्हापासून अर्जुन रामपाल आणि तिची जवळीक वाढतच गेली. त्यापूर्वी “बिग बॉस’च्या आठव्या सिझनमध्येही ती मुख्य स्पर्धक होती. यापूर्वी नताशा आणि “ये है मोहोब्बतें’चा ऍक्टर अली सोनी यांचेही अफेअर होते. प्रकाश झा यांच्या “सत्याग्रह’मध्ये तिने एक आयटम सॉंगही केले होते. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन, अजय देवगण यांच्याबरोबर अर्जुन रामपालही होता.
नताशा ही मूळची सायबेरियाची मॉडेल, ऍक्ट्रेस आहे. तिने प्रॉडक्शन आणि डायरेक्शनचेही काम केले आहे. प्रोड्युसर, डायरेक्टर म्हणून तिने “जर्नी ऑफ रेड फ्रिज’ (2007) आणि “पूनम’ (2008) या डॉक्युमेंटरीही बनवल्या आहेत. हृतिक रोशनची पूर्वीची पत्नी सुजैन खानबरोबर अर्जुनचे अफेअर असल्याचे बोलले जात होते. पण प्रत्यक्ष्यात त्याचे या मॉडेलबरोबर अफेअर आहे, असा अपडेट मिळतो आहे.