Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा; नानावटी रुग्णालयात दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Big-B-660.jpg)
मुंबई |मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये अमिताभ बच्चन यांना दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ यांना नेमकं कशामुळे दाखल करण्यात आलं यासंदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नव्हती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या काळात अचानक नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. मात्र, अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.
मी स्वत:ला रुग्णालयात दाखल केलं असून माझा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतर, माझे कुटुंबीय आणि संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांचाही स्वॅब घेण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या स्वॅबचा अहवाल अद्याप आला नसल्याचे सांगितले.