Breaking-newsमनोरंजन
अमिताभची नात पंतप्रधान होणार; ज्योतिषी डी. ज्ञानेश्वर यांची भविष्यवाणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/abhishek-aaradhya-.jpg)
हैदराबाद: बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रॉय यांची मुलगी आराध्या भारताची पंतप्रधान होईल, अशी भविष्यवाणी प्रसिद्ध ज्योतिषी डी. ज्ञानेश्वर यांनी केली आहे. ज्ञानेश्वर यांनी या आधी केलेल्या भविष्यवाणी तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत.
विशेष म्हणजे ज्ञानेश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भविष्यवाणी केली आहे. अमिताभ यांची नात आराध्या भविष्यात भारताची पंतप्रधान होईल. फक्त त्यासाठी त्यांनी आराध्याचे नाव बदलून रोहिणी ठेवायला हवे, असा सल्लाही ज्ञानेश्वर यांनी दिला आहे. या आधी सुपरस्टार रजनीकांत आणि चिरंजीवी राजकारणात प्रवेश करतील, अशी भविष्यवाणी केली होती, ती खरी ठरल्याचा दावाही ज्ञानेश्वर यांनी केला आहे. २००९ मध्ये काँग्रेस केंद्रात सरकार स्थापन करणार असल्याची भविष्यवाणीही त्यांनी केली होती.
दरम्यान, सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री होतील, अशी नवी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडणूक जिंकतील आणि भारत-पाकिस्तान दरम्यान २०२४ मध्ये युद्ध होईल, अशी भविष्यवाणी वर्तवतानाच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश यांना २०१९ मध्ये लग्न करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.