अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा ‘हा’ व्हिडीओ पाहून नेटक-यांना आठवली राखी सावंत…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-96.png)
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उर्वशी रौतेला तिच्या फोटोमुळे सध्या खुप चर्चेत असते… मात्र आता उर्वशी एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. मला ‘आय लव्ह यू’ म्हण अशी लाडीक मागणी करताना ती या व्हिडीओमध्ये करताना दिसतेय.खरतर व्हिडीओत उर्वशी दिल्लीच्या मुलींची मिमिक्री करताना दिसतेय…मात्र या व्हिडीओमुळे तिला दुसरी राखी सावंत अशी कमेन्ट मिळतेय…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/000-19.png)
‘या व्हॅलेन्टाईन वीकमध्ये दिल्लीच्या मुली काहीसे असे म्हणतील, तू एकदा आय लव्ह यू म्हण, फक्त एकदा आय लव्ह यू म्हण’, असे कॅप्शन उर्वशीने या व्हिडीओला दिले आहे. उर्वशीचा हा मजेशीर व्हिडीओ आत्तापर्यंत 11 लाखांवर लोकांनी पाहिला आहे. काहींना तो आवडला. पण काहींनी मात्र यावरून उर्वशीला चांगलेच ट्रोल केले. काहींनी तर तिची तुलना राखी सावंतसोबत केली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1-1.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/2-1.png)
‘क्या फूंका बहन?’असे एका ट्रोलरने लिहिले आहे. तर अन्य एका ट्रोलर आता बॉलिवूडला दुसरी राखी सावंत मिळणार आहे, असे लिहित ट्रोल केले आहे. एकाने तिला ‘सस्ता गांजा’ अशा शब्दांत ट्रोल केले आहे. ‘तू पण राखी सावंत बनण्याच्या मार्गावर आहे. पण आणखी एक राखी सावंत आम्ही सहन करू शकणार नाही,’ असे लिहित एका युजरने तिची खिल्ली उडवली आहे.