Breaking-newsमनोरंजन

अभिनेत्री आएशा टाकियाला धमकीचे फोन

बॉलिवूड अभिनेत्री आएशा टाकियाला फोनवरुन धमकी मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. आएशाचा पती फरहान आझमी याने याबाबत एक ट्विट केले असून त्याची पत्नी, आई आणि 7 महिन्यांच्या गर्भवती बहिणीला फोनवरुन धमक्या मिळत असल्याचे त्याने सांगितले.

Farhan Azmi@abufarhanazmi

My wife @Ayeshatakia , mother & sisters are being harassed,threatened stalked by a litigant, @MumbaiPolice refusing to answer my calls or messages. has illegally frozen our bank accounts Dear PM @narendramodi ji @SushmaSwaraj Pls intervene!!

फरहान याने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबई पोलीसचे डिसीपी दहीया यांनी त्याच्या फोनला किंवा मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही. फरहानने हेही सांगितले की, त्यांचे बॅंक अकाऊंटही फ्रिज झाले आहेत.

फरहान याने सांगितले की, एका केसशी निगडीत व्यक्तीकडून या धमक्या मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, फरहानवर त्याचा माजी बिझनेस पार्टनर काशिफ खान याने फसवणूक केल्याचा आरोप केला होता. काशिफने फरहान विरोधात बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये एआयआर दाखल केला होता. फरहान याने काल रात्री या धमक्यांना वैतागून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांना पोस्टमध्ये टॅग करत त्यांच्या मदतीची मागणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button