अभिनेत्रि पूजा हेगडेच्या एका भेटीसाठी तिचा चाहता राहिला पाच दिवस रस्त्यावर…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/new-27.png)
आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते कधी काय करतील याचा नेम नसतो. बऱ्याच वेळा सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी चाहते त्यांच्या घराबाहेर गर्दी करत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीच्या चाहत्याने तिला पाहण्यासाठी चक्क पाच दिवस रस्त्यावर काढले. त्या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या चाहत्याने नाव भास्कर राव असे आहे. त्याने पूजाची एक झलक पाहण्यासाठी चक्क पाच दिवस तिच्या घराबाहेर घालवले. तो पाच दिवस रस्त्यावर झोपला. पूजाला हे कळताच तिने चाहत्याची भेट घेत माफी मागितली. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पूजाने दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या ‘मोहंजदडो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती हृतिक रोशनसह मुख्य भूमिकेत झळकली होती.