breaking-newsमनोरंजन

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी शौविक चक्रवर्तीची १८ तास चौकशी

मुंबई – सध्या चर्चेत असलेल्या अभिनेता सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याची ईडीने १८ तास कसून चौकशी केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे सुशांत आत्महत्याप्रकरणी चक्रवर्ती कुटुंबाच्या भोवतीचा फास अधिकच आवळल्या गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

या आधी शुक्रवारी ईडीने शौविकची दोन तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर त्याला घरी जाण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची ९ तास कसून चौकशी करण्यात आली होती. सुशांत आत्महत्या प्रकरणी ईडीने आतापर्यंत रिया, शौविकसह सुशांतची मॅनेजर श्रृती मोदी आणि सीए रितेश शाहचीही चौकशी केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर १५ कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. शौविक काल दुपारी बाराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात आला होता. आज पहाटे सहा वाजता तो ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडला. तब्बल १८ तासाच्या चौकशीत ईडीने शौविकवर सुशांतच्या बँक खात्याशी संबंधित प्रश्नांचा मारा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, बिहार पोलिसांनी सुशांतसिंह प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयला सोपवली आहेत. सुशांतसिंह प्रकरणात आपल्यालाही पक्षकार बनविण्यात यावे, अशी विनंती सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाला केल्याचे सूत्रांनी सांगितले. तर सुशांतचे वडील के. के. सिंह आणि त्याची बहीण राणी सिंह यांनी शनिवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेऊन चर्चा केली. हे प्रकरण सीबीआयकडे गेल्याने तुम्हाल न्याय मिळेल, असा विश्वास खट्टर यांनी यावेळी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button