अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कँसर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Sanjay-datt.jpg)
मुंबई | मुन्नाभाईच्या फॅन्ससाठी धक्कादायक बातमी समोर आलीय. अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसचा कँसर झाल्याची माहिती मिळतेय. महत्त्वाची बाब म्हणजे संजय दत्तचा हा आजार तिसऱ्या स्टेजवर आलाय. कँसरचं निदान झाल्यानंतर आता संजय दत्तला उपचारांसाठी अमेरिका किंवा सिंगापूरला नेणार असल्याची माहिती समोर येत आहे. आजच संजय दत्तनं स्वत: ट्विट करून आपल्या फॅन्सना त्याची तब्येत खराब असल्याची माहिती दिली होती.
त्याच्या या ट्विटनंतर फॅन्सची काळजी वाढली होती. आता तर त्याला कँसर झाला असल्याचं कळल्यानंतर संजय दत्तच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर त्याचा तब्येतीत लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. चित्रपट समिक्षक कोमल नहाटा यांनी संजय दत्त बाबत ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी संजय दत्तला फुफ्फुसाचा कँसर झाल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे केआरके बॉक्स ऑफिसनं सुद्धा संजय दत्तला कँसर झाल्याची बातमी देत तो उपचारांसाठी सिंगापूरला जाणार असल्याचं म्हटलंय. तर फिल्मफेअरद्वारेही ट्विटकरून संजयच्या कँसरबाबत सांगण्यात आलं आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनं मेडिकल ट्रिटमेंटसाठी शॉर्ट ब्रेक घेतला आहे. त्यानं आपल्या चाहत्यांना काळजी न करण्यास सांगितलंय. सोबतच कुठल्याही प्रकारच्या चर्चा आणि शंका न काढण्यासही त्यानं आपल्या चाहत्यांना सांगितलं. ६१ वर्षीय अभिनेता संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे शनिवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि सोमवारी तो हॉस्पिटलमधून घरी परतला आहे.