Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अभिजीत बिचुकलेविरोधातील तक्रार मागे, बिग बाॅसच्या घरात परतणार?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/69939512.jpg)
मुंबई – अभिजित बिचुकले याच्या विरोधातील खंडणीची तक्रार खुद्द तक्रारदारानेच आता मागे घेतली असून बिग बॉसच्या घरात परतण्याचा बिचुकलेचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.
अभिजीत बिचुकले विरोधात फिरोज पठाण यांनी खंडणीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात बिचुकलेला न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. परंतु, बिचुकले विरोधात केलेली ही तक्रार पठाण यांनी आता मागे घेतली आहे. बिचुकले यांच्या विरोधातील तक्रार आपण स्वत:हून मागे घेत असल्याचे फिरोज पठाण यांनी न्यायालयात लिहून दिले आहे.
‘अभिजीत बिचुकले ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरात खेळत आहे ते पाहाता तो नक्कीच जिंकेल. अभिजित बिचुकलेमुळे साताऱ्याचे नाव उंचावले आहे’ असं पठाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे बिचुकले आता लवकरच पुन्हा बिग बॉसच्या घरात दिसेल अशी जोरदार चर्चा रंगली आहे.