अबब…बॉलिवूडमधील आतापर्यंतचं सर्वात हॉट गाणं रिलीज, पाहा VIDEO
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/garmi.jpg)
मुंबई | बॉलिवूडमध्ये सध्या जास्तच बजेट असणारे सिनेमा रिलीज होत आहेत. नव्या वर्षातही रिलीज होणाऱ्या सिनेमांची खूपच मोठी यादी आहे. यापैकीचा एक सिनेमा म्हणजे वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा ‘स्ट्रीट डान्सर’. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्यानंतर आता या सिनेमातील ‘गर्मी सॉन्ग’ रिलीज झाले आहे. हे गाणं बॉलिवूडमधील आतापर्यंतचे सर्वात बोल्ड गाणं मानले जात आहे.
गर्मी सॉन्गमध्ये नोरा फतेही आणि वरुण धवन यांच्या किलर डान्स मूव्ह पाहायला मिळत आहे. पण या गाण्यला नोराने दिलेला बोल्डनेसचा तडका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नोराने डान्स केलेल्या आतापर्यंतच्या गाण्यांमध्ये हे सर्वाधिक बोल्ड आणि हॉट गाणं असल्याचे बोलले जात आहे. या गाण्याच्या सुरुवातीलाच सूचना देण्यात आली आहे. ‘सावधान, जो आप देखने जा रहे हैं वो इतना हॉट है कि उसे नजरअंदाज करना मुश्किल है’. यानंतर नोराचा बोल्ड आणि सिजलिंग अवतार या गाण्यात दिसत आहे.