अन् अक्षय कुमार बनला वाहतूक हवालदार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/akshaykumar-6.jpg)
बॉलीवुडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार याने आपल्या अभिनयाने दोन-तीन दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तसेच सतत कोणत्या न कोणत्या सामाजिक उपक्रमातही तो सहभागी होत असतो. याचाच एक भाग म्हणून आता अक्षय कुमार वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या गणवेशात रस्त्यावर उतरणार आहे. या वृत्ताला मुंबई वाहतूक पोलीस विभागानेही दुजोरा दिला आहे.
सामाजिक संदेश देणाऱ्या आणि वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी राबविणाऱ्या या उपक्रमाची माहिती सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून स्वतः अक्षय कुमारने दिली आहे. या फोटोत अक्षय कुमार वाहतूक हवालदाराच्या गणवेशात अन्य कर्मचाऱ्यांसोबत बोलताना दिसतो. हा फोटो शेअर करत अक्षयने लिहिले की, मंत्रालयाच्या “रोड सेफ्टी’ उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद असून चालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यातून नक्कीच मदत होईल. मला आशा आहे की, या उपक्रमामुळे वाहतूकीचे नियम आणि सुरक्षितता कायम राखण्यात यश मिळेल, असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.
हवालादाराच्या रूपातील फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, अक्षयने सामाजिक संदेश देणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आणि याआधी सुद्धा विविध सामाजिक कामांच्या माध्यमातून तो लोकांसमोर आलेला आहे.