breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अन्नाथेच्या सेटवरील 8 जणांना कोरोना; सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल

हैदराबाद – दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने आज सकाळी ते हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात दाखल झाले. रजनीकांत गेल्या 10 दिवसांपासून हैदराबादमध्ये चित्रीकरण करत होते. 22 डिसेंबरला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, ती निगेटिव्ह आली. त्यानंतर आता उच्च रक्तदाबाशिवाय त्यांना इतर कोणताही त्रास नसल्याची माहिती अपोलो रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

वाचा :-अभिनेता शशांक केतकरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन

कोरोना काळातील कडक लॉकडाऊनमध्ये सर्व चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. मात्र आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्व चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा सुरू केले जात आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे सध्या अन्नाथे या चित्रपटाचे चित्रीकरणात व्यस्त होते. मात्र या चित्रीकरणाच्या ठिकाणी आठ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रजनीकांत यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली पण सुदैवाने ती निगेटिव्ह आली. दरम्यान, हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 14 डिसेंबरपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले होते. ज्यानंतर सेटवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे चित्रीकरण थांबविण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button