Breaking-newsमनोरंजन
अनिकेत विश्वासरावच्या कारला भीषण अपघात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/aniket-v-accident.jpg)
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ भीषण अपघात झाला. ‘मस्का’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असतानाच हा अपघात झाला.
आज सकाळी ८ वाजता लोणावळ्याजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अनिकेतच्या कारला भीषण अपघात झाला. हायवेवरील थांबलेल्या टेम्पोजवळून जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला. अपघात झाला त्यावेळा कारमध्ये अनिकेत, प्रार्थना, प्रार्थनाची असिस्टंट आणि चालक असे चौघेजण उपस्थित होते. प्रार्थनाच्या हाताला आणि डोक्याला जबर मार लागला असून तिला उपचारासाठी वळवणमध्ये दाखल केले आहे.