अक्षय कुमारला टक्कर देणार सनी देओल
बॉलीवूडमध्ये सध्या रिलीज डेट निश्चित करणे हे चित्रपट निर्मितीपेक्षा कठिण काम बनले आहे. अनेक स्टार कलाकारांनी सर्व सणांच्या तारखा आपल्या नावे करून ठेवल्याने अन्य चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता अक्षय कुमार आणि सनी देओल यांच्यात टक्कर होणार असून दोघांचे चित्रपट एकाच दिवशी 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
सनी देओल याचा एक चित्रपट तयार आहे. मात्र, त्याच्या रिलीज डेटमुळे सनी देओल चिंतेत आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सनी देओलने निश्चित केले आहे. या चित्रपटाचे नाव “यमला पगला दिवाना फिर से’ असे आहे. या चित्रपटात तिन्ही देओल अर्थात सन्नी, बॉबी आणि धमेंद्र हे झळकणार आहे.
हा चित्रपट पूर्वी एप्रिल, त्यानंतर जून, त्यानंतर जुलैमध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, आता हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. याच दिवशी अक्षय कुमार यांचा “गोल्ड’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.