breaking-newsमनोरंजन

अंकुश चौधरीची पत्नी आहे खूपच सुंदर; जाणून घ्या तिच्याबद्दल..

दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेता अंकुश चौधरी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली. जवळपास वर्षभरानंतर त्याचा ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला तिकिटबारीवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मराठीतील आघाडीचा अभिनेता म्हणून अंकुशकडे पाहिले जाते. अंकुशची पत्नी दीपा परबचा आज वाढदिवस. २००७ साली अंकुशने दीपाशी लग्न केलं. दीपासुद्धा अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे.

एमडी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अंकुश व दीपाची पहिल्यांदा भेट झाली. महाविद्यालयात असतानाच हे दोघं एकमेकांना डेट करु लागले. जवळपास दहा वर्षे डेट केल्यानंतर अंकुश-दीपाने लग्न केलं. ‘ऑल द बेस्ट’ या गाजलेल्या नाटकात दोघांनी एकत्र काम केलं. या दोघांना प्रिन्स नावाचा मुलगा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button