पाटी-पुस्तक

‘ऑलिंपिक चॅम्पियन: नीरज चोप्रा’ इंग्रजी पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन

ऑलिम्पिक पदकविजेता स्वप्निल कुसाळे यांची प्रमुख उपस्थिती

पुणे | लेखक, क्रीडा अभ्यासक संजय दुधाणे लिखित ‘ऑलिंपिक चॅम्पियन: नीरज चोप्रा’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार दि.२८ ऑगस्ट रोजी ४.३० वाजता होणार आहे.

ऑलिंपिक कांस्य पदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांच्या हस्ते ‘ऑलिंपिक: चॅम्पियन नीरज चोप्रा’ या इंग्रेजी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष प्रा. सुरज शर्मा, प्रमुख सल्लागार राजेंद्र सिंग, संचालक डॉ. अजित साने, आशुतोष रामगीर आणि लेखक संजय दुधाणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा    –    छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही; काशिनाथ नखाते 

प्रा. दुधाणे यांनी नीरजची मेहनत आणि त्याच्या कारकीर्दीतील चढउतार किती जवळून पाहिले आहेत, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना प्रत्येक क्रीडाप्रेमीला येईल. एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिंपिक स्पर्धेतील पदकविजेता हा नीरजचा प्रवास कथन करणारे हे चरित्र केवळ क्रीडापटूंनाच नव्हे, तर सर्वच वाचकांना प्रेरणा देईल असे आहे.

पुस्तकाचे प्रकाशन बुधवार, दि.२८ ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, बावधन येथे होणार आहे. याप्रसंगी ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसाळेचा गौरवही रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट करणार आहे. प्रकाशनानंतर स्वप्निल कुसाळे व लेखक संजय दुधाणे यांचा पॅरीस ऑलिम्पिकमील अनुभवावर मुलाखतीही घेतली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button