breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात भर पहाटे आग; मच्छी व चिकन दुकाने जळून खाक

पुणे – पुणे शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये आज पहाटे भीषण आग लागली. पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अग्नितांडवात तब्बल २५ दुकाने जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कॅम्प परिसरात छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये मच्छी, चिकन आणि अन्य वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. मार्केटमध्ये आज पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली. या मार्केटमध्ये दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशमन दलाने काही मिनिटांतच घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या घटनेत मच्छी विक्रेत्यांची १७ आणि चिकन विक्रेत्यांची ८ अशी २५ दुकाने जळून खाक झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button