breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

करोना पॉझिटिव्ह असूनही अभिनेत्री शूटिंगला गेली; गौहर खानविरोधात गुन्हा दाखल

मुंबई |

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आज अभिनेत्री गौहर खान विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काय आहे कारण? चला पाहूया. अभिनेत्री गौहर खानला करोनाची लागण झाली आहे आणि तिला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, गौहर खान शूटिंगसाठी गेली असल्याचं समोर आलं आहे. ओशिवरा पोलिसांच्या माहितीनुसार, गौहरचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, अंधेरीतल्या तिच्या घरी जेव्हा ते गेले त्यावेळी तिथे कोणी दार उघडलं नाही. आणि त्यानंतर हे कळालं की ती बाहेर शूटिंगसाठी गेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आहे.

ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडसंहितेच्या साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कलम १८८, २६९, २७०, ५१ब अन्वये तिच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. यावर महापालिकेकडून ट्विटही करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “शहराच्या सुरक्षेसंदर्भात कसलीही तडजोड केली जाणार नाही. करोना बाधित असतानाही कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. आमची नागरिकांना विनंती आहे की या नियमांचं पालन करा आणि शहराला करोनाला हरवण्यासाठी मदत करा.”

वाचा- ‘प्लॅनेट मराठी’च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून शरद पोंक्षे यांचे वेबसिरीजमध्ये पदार्पण

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button