breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#Covid-19: राज्यात संपूर्ण लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाहीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई |

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक. अजित पवार, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांची बैठकीत हजेरी, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेदेखील बैठकीला उपस्थित. व्यापाऱ्यांच्या भूमिकेबाबत बैठकीत चर्चा झाली. लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणता पर्याय दिसत नाही. रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ. 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते, ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता लॉकडाऊन हाच पर्याय आहे.
– मुख्यमंत्री

• कडक लॉकडाऊनची गरज अन्यथा 15 दिवसांनंतर परिस्थीती गंभीर – मुख्य सचिव

• सर्वपक्षीय बैठकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होईल; राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाउनबाबत चर्चा – उपमुख्यमंत्री अजित पवार

• महिन्याला एक लाख रेमडेसिवीर लागतील, 50 हजार रेमडेसिवीरचा सध्या तुटवडा – राजेश टोपे

• मृत्यूदर थोपवण्यासाठी सर्वोत्तम उपाय करावा, नियंत्रण मिळविण्यासाठी कटू निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात

• रुग्णसंख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, त्यामुळं लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार. या बैठकीत विरोधी पक्षाचेही मत विचारात घेतले जाणार – वडेट्टीवार

• राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा; रेमडेसिवीर कसे उपलब्ध करता येईल, याबाबत राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, चाचणी केल्यानंतर अहवाल तात्काळ मिळावे, संपूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल – फडणवीस

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button