breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

#Covid-19: गृह विलगीकरणातूनही प्रसार

  • रुग्णांकडून नातेवाईकांना संसर्ग; शहरी भागात शासकीय विलगीकरण व्यवस्था अपुरी

मुंबई |

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०९१ नागरिकांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी १२९२ रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. पालघर, बोईसर, डहाणू या भागांमध्ये विलगीकरणासाठी शासकीय विलगीकरण केंदे्र कमी असून त्याबरोबर उपलब्ध केंद्रांमध्ये नागरिक दाखल होत नसल्याने गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांकडून त्यांच्या नातेवाईकामध्ये आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात असलेल्या रुग्णांपैकी सुमारे ९०० रुग्ण हे पालघर- बोईसर परिसरातील आहेत. पालघर येथील करोना काळजी केंद्र भरण्याच्या स्थितीत असून बोईसर येथे सध्या असे एकही केंद्र कार्यरत नाही.

जव्हार तालुक्यात सध्या ३२० रुग्ण असून डहाणू तालुक्यातील रुग्णसंख्या १८७ वर पोहोचली आहे. इतर तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील २०९१ उपचारांची रुग्णांपैकी १५१४ रुग्ण गृह विलगीकरणात असून त्यांच्याकडून याबाबतची नियमांचे पालन होत नसल्याने आजार झपाट्याने पसरत आहे. गृह विलगीकरण केलेल्या नागरिकांच्या हातावर छापे मारणे आवश्यक असून सक्रिय रुग्ण तसेच आरटीपीसीआर तपासणी केलेल्या रुग्णाच्या हातावर त्या आशयाचे छापे मारणे गरजेचे झाले आहे.

वाचा- #Covid-19: स्वत:चं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस- उपमुख्यमंत्री अजित पवार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button