breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

अजित पवारांचं टेन्शन वाढणार! काँग्रेसचा ‘या’ लोकसभा मतदारसंघावार दावा

पिंपरी : पुणे जिल्ह्यात सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या या दाव्यानंतर आता मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मावळातून तीनवेळा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्या ठिकाणी काँग्रेसची चांगली ताकद आहे. काँग्रेसने पिंपरी-चिंचवडचा कायापालट केला आहे. या भागाचे काँग्रेस नेत्यांनी अनेक वर्षे लोकसभा, विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे केली आहे.

हेही वाचा – Disney+ Hotstar ची मोठी घोषणा! वर्ल्डकप आणि आशिया कप मोफत पाहता येणार

मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला, तर पिंपरी-चिंचवड शहरातील दोन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडावेत. तीनही ठिकाणी राष्ट्रवादी लढल्यावर शहरात काँग्रेसला उभारी कधी मिळेल. काँग्रेसला १५-१५ वर्षे निवडणूक लढविण्याची संधी दिली नाही. तर कार्यकर्ते पक्षआत कसे राहतील. काँग्रेसच्या ताकतीने राष्ट्रवादी निवडून येत आहे. त्यामुळे दोन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला घेण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button