breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

CID फेम दिनेश फडणीस यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन

Dinesh Phadnis : CID फेम फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूसन दिनेश याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारा दरम्यान दिनेश याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. पण सोमवारी रात्री १२ वाजता दिनेश फडणीस याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्यावर मंगळवारी ५ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.

हेही वाचा  –  अखेर भिडेवाडा जमीनदोस्त; पोलीस बंदोबस्तात रात्री महापालिकेकडून कारवाई 

दिनेश फडणीस याने अनेक मालिका, शो, सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण दिनेश याला ‘सीआयडी’ मध्ये फ्रेड्रिक्स ही भूमिका साकारल्यानंतर लोकप्रियता मिळाली. दिनेश यांनी CID शिवाय, अभिनेता आमिर खान स्टारर ‘सरफरोश’ आणि अभिनेता हृतिक रोशन स्टारर ‘सुपर ३०’ सिनेमात देखील काम केलं होतं . एवढंच नाही तर, दिनेश याने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत देखील एक छोटी भूमिका साकारली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button