ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

अभिनेता सोनू सूद खऱ्या आयुष्यातही हिरो

चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी अभिनेत्याची मोठी मदत

मुंबई : करोना काळात अनेकांसाठी ‘मसीहा’ ठरलेला अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने एका लहान मुलाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. जयपूरमध्ये स्पाइनल मस्क्युलर ऍट्रोफी (SMA) टाईप २ शी झुंज देत असलेल्या २२ महिन्यांच्या लहान मुलाचा प्राण वाचवण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. हा एक दुर्मिळ आनुवंशिक आजार आहे. हृद्यांश असं या चिमुरड्याचं नाव असून जगभरातील सर्वात महागड्या इंजेक्शनपैकी असणाऱ्या इंजेक्शनची त्या चिमुरड्याला गरज होती. या इंजेक्शनसाठी १७ कोटी रुपये मोजावे लागणार होते.

या इंजेक्शनसाठी लागणाऱ्या खर्चासाठी मुलाच्या आईवडिलांकडून मार्चमध्ये मोहीम सुरू करण्यात आली. समाजाच्या विविध घटकांकडून त्यांना पाठिंबा मिळाला होता. क्रिकेटपटू दीपक चहर आणि अभिनेता सोनू सूद यांसारख्यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट केली होती. त्या माध्यमातून हृदयांशच्या आईवडिलांना व्यापर प्रतिसाद मिळाला आणि तीन महिन्यात ९ कोटी रुपये जमा झाले. सोनूने या मोहिमेचे नेतृत्त्व केले होते.

सोनूने याआधीही अशाप्रकारच्या गंभीर प्रकरणांमध्ये अनेकांना पाठिंबा दिला होता. असे समोर आले आहे की त्याने अशाप्रकारे आतापर्यंत ९ जणांचे प्राण वाचवले आहेत. सोनूच्या प्रयत्नांमुळे आणि देशभरातील लोकांच्या प्रचंड पाठिंब्यानंतर ही मोठी रक्कम यशस्वीरित्या जमा करण्यात आली आणि आणखी एक जीव वाचला.

सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल…

दरम्यान सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच दिग्दर्शकीय पदार्पण करतो आहे. ‘फतेह’ सिनेमाचे तो दिग्दर्शन करत असून तोच यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा सध्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये आहे. जगभरातील विविध ठिकाणी चित्रित करण्यात आलेल्या या सिनेमात सोनूसह जॅकलिन फर्नांडिस आहे. शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओजने सिनेमाची निर्मिती केली असून ‘फतेह’ याचवर्षी प्रदर्शित होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button