breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर; म्हणाले..

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांची आज आंतरवाली येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. १० दिवसांत आरक्षण द्या अन्यथा पुढच्या गोष्टी सरकारच्या हातात नसतील असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

छगन भुजबळ म्हणाले, माझ्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक मराठा नेत्यांसह काम केलं. माझेही काहीतरी योगदान आहे. मला मात्र आज मराठ्यांनी मोठं केलं असं सांगत शिव्या दिल्या जातात. मात्र मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं. मराठा समाज नादान किंवा असंस्कृत नाही, माझ्यामुळे त्यांच्या फूट पडणार नाही.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकांची पूर्वतयारी सुरू; सर्व मतदारसंघांचा घेण्यात आला आढावा

शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाजकार्यात आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठं केलं, असं सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठं हे शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यासोबत मी काम केलं आहे. माझं देखील काहीतरी योगदान आहे. म्हणूनच मला संधी दिली गेली असेल. माझा माझ्या समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button