breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

इन्श्युरन्स कंपनीने तुमचा क्लेम रिजेक्ट केला तर या पद्धतीने तुम्ही करू शकता तक्रार?

Insurance : आजकल नागरिक हॉस्पिटलच्या अतिरिक्त बिलामुळे हेल्थ इन्श्युरन्सला (क्लेम) अधिक प्राधान्य देतात. मात्र कधीकधी क्लेम केलेल्या इन्श्युरन्स कंपनीकडून तो रिजेक्ट केला जातो. अशा स्थितीत तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता.

IRDAI च्या नियमांनुसार तुम्ही क्लेम करताना इन्श्युरन्स कंपनीने दिलेल्या प्रतिसादाने तुम्ही समाधानी नसाल तर तुमची तक्रार भारतीय पॉलिसी नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) च्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदवू शकता. हे व्यासपीठ ‘Bima Bharosa System’ म्हणून ओळखले जाते. तसेच तुम्ही @irdai.gov.in या ईमेल आयडीद्वारे तक्रार देखील करू शकता.

हेही वाचा – बच्चू कडू यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, तुमच्या बापाने..

याशिवाय तुम्ही 155255 किंवा 1800 4254 732 डायल करून आपली तक्रार नोंदवू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही इन्शुरन्स कंपनीने नाकारल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत विमा लोकपालकडे तक्रार दाखल करू शकता. तुम्ही तुमची तक्रार https://www.cioins.co.in वर ऑनलाईन नोंदवू शकता किंवा तुमच्या जवळच्या लोकपाल कार्यालयात जाऊन तुमची तक्रार ऑफलाइन देखील नोंदवू शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button