breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

Yes बँकेची इमिजिएट पेमेंट सर्व्हिस सुरु, ग्राहकांना मोठा दिलासा

आर्थिक निर्बंधात असलेल्या येस बँकेने मंगळवारी इमिजिएट पेमेंट सर्व्हिस अर्थात IMPS ही २४ तास चालणारी ऑनलाईन सेवा पुन्हा सुरु केली आहे. त्याचबरोबर NEFT सेवा देखील सुरु केली आहे. बॅंकेने ट्विट करून IMPS/NEFT सेवा बहाल केल्याचे जाहीर केले. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आर्थिक अनियमितता आणि वारेमाप कर्ज वाटपामुळे रिझर्व्ह बँकेने (RBI) येस बँकेवर ५ मार्चपासून निर्बंध लागू केले आहेत. ३ एप्रिलपर्यंत बँकेच्या खातेदारांना खात्यातून एकदाच ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. मात्र यानंतर बँकेची नेट बँकिंग, मोबाइल ऍप, डेबिट आणि क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि ATM सेवा पूर्णपणे खंडीत करण्यात आली होती. गुगलपे, फोनपे सारखी इतर मोबाइल वॉलेट्स आणि इतर बँकेच्या ATM मधून येस बँक खातेदारांना आर्थिक व्यवहार करता येत नसल्याने निर्बंध लागू लागू झाल्यानंतर येस बँक खातेदारांची चार दिवस पुरती कोंडी झाली होती. ग्राहकांना केवळ बँक शाखेत पैसे काढता येणार असल्याने शाखांबाहेर ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, बँकेने सोमवारी ATM सेवा ग्राहकांना उपलब्ध केली होती. ग्राहकांना एटीएम मधून काढण्यास येस बँकेने मुभा दिली आहे. त्याचबरोबर अन्य बँकांनीही आपली ATM यासाठी खुली ठेवली आहेत. ATM पाठोपाठ आज बँकेने IMPS/NEFT सेवा कार्यरत केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना येस बँकेने म्हटले आहे की, बँकेची IMPS/NEFT कार्यरत झाली आहेत. या सेवांच्या माध्यमातून खातेदार आर्थिक व्यवहार करु शकतात. तसेच कर्जाचे हप्ते फेडू शकतात. बँकेच्या ग्राहकांना यासाठी डेबिट व क्रेडिट कार्डांचा वापरही करता येईल. असा वापर येस बँकेच्या स्वतःच्या एटीएममध्ये किंवा अन्य बँकांच्या एटीएममध्येही करता येणार आहे…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button