breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

सोन्या-चांदीच्या भावात किरकोळ घसरण, जाणून घ्या आजच्या किंमती

  •  मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 47,740 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,740 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीचा भाव हा 72,400 रुपये इतका आहे.

मुंबई – शनिवारी बाजार बंद होताना सोन्या-चांदीच्या किंमतीत किरकोळ घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. सोन्याच्या किंमतीत 20 रुपयांची तर चांदीच्या किंमतीत 200 रुपयांची घसरण झाली आहे. आज रविवारी, मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 47,740 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,740 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीचा भाव हा 72,200 रुपये इतका आहे.

कोरोना काळातही सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पहायला मिळाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी सोन्याची किंमत 44 हजारांवर आल्याचं पहायला मिळालं होतं तर चांदीची किंमतही 50 हजारांच्या जवळपास आल्याचं दिसत होतं. त्यामध्ये सातत्याने सुधारणा होत आता सोन्या- चांदीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. आज सोनं हे 50 हजारांकडे सरकत आहे तर चांदीने 72 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

गेल्या 10 दिवसांचा विचार करता सोन्याचे भाव हे किरकोळ स्वरुपात बदलत आहेत. 2 जून रोजी सोन्याचा भाव हा 49,230 रुपये इतका होता. . त्यानंतर सोन्याच्या भावात कमी अधिक चढ-उतार पहायला मिळाली. 10 जून रोजी सोन्याच्या भावात 200 रुपयांची वाढ झाली तर 11 जून रोजी 120 रुपयांची घसरण झाली. कालही त्यामध्ये 20 रुपयांची घसरण झाली आणि ते 48,740 रुपयांवर पोहोचलं.

शनिवारी चांदीचा दर हा 72,400 रुपये इतका होता. आज त्यामध्ये 200 रुपयांची घसरण झाली असून ती किंमत 72,200 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 2 जून रोजी चांदीचा भाव हा 71,900 रुपये इतका होता. नंतर त्यामध्ये कमी अधिक चढ उतार होत राहिली. शुक्रवारी चांदीच्या भावात 1000 रुपयांची वाढ झाली आणि आज 200 रुपयांची घसरण झाली आहे.

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास आठ हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.

4

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button