मेट्रो-३ प्रकल्पासाठी स्थावर मालमत्तेमधून ₹१,००० कोटी उभारण्याची अट
रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

मुंबईः कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाला गती देण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांच्यात नरिमन पॉईंट येथील भूखंड विक्री करार पूर्ण झाला आहे. १६,८४२ चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या या भूखंडासाठी आरबीआयने एकूण ₹३,४७१.८२ कोटींचा भरणा केला असून यात ₹२,८७१ कोटी फ्रीहोल्ड मालकी हक्कांसाठी तर पुनर्वसन क्षेत्र उपलब्ध करून देण्यापासून सूट मिळविण्यासाठी ₹६००.८२ कोटींचा समावेश आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
मेट्रो-३ प्रकल्पासाठी स्थावर मालमत्तेमधून ₹१,००० कोटी उभारण्याची अट केंद्र सरकारने घातली होती. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने नरिमन पॉईंट येथील प्लॉट क्र. १९८७ व १९८८ एमएमआरसीला दिले होते.
सुरुवातीला या जागेच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, मात्र आरबीआयने थेट खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या नव्या कार्यालयीन इमारतीसाठी हा भूखंड वापरण्याची योजना असून, आवश्यक सर्व मंजुऱ्या घेऊन शासन-ते-शासन पातळीवरील हा करार निश्चित करण्यात आला. या व्यवहारामुळे मेट्रो-३ प्रकल्पाच्या भांडवली कामांना आवश्यक आर्थिक चालना मिळणार आहे.