अवघ्या 31 दिवसांत पेट्रोल-डिझेल 8 रुपयांनी महागलं
![A big reduction in petrol-diesel prices on the day of Lakshmi Puja](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Petrol-1-1-2.jpg)
मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सुरुवातीला दिल्ली आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेल्या इंधन दरवाढीचा वणवा आता देशभरात पसरला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली असून डिझेलही त्याच मार्गावर आहे. तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे तर डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ केली होती. परंतु आज कोणत्याच प्रकरची वाढ झाली नसून आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, आज इंधनाचे दर स्थिर जरी असले तरी अवघ्या 31 दिवसांत पेट्रोलच्या दरात 08.06 रुपयांनी, तर डिझेलच्या प्रतिलिटर दरात 08.17 रुपयांनी वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल, डिझेलचे दर (प्रतिलिटर)
दिल्ली – पेट्रोल : 98.52, डिझेल : 88.95
मुंबई – पेट्रोल : 104.62, डिझेल : 96.48
कोलकाता – पेट्रोल : 98.36, डिझेल : 91.80
चेन्नई – पेट्रोल : 99.55, डिझेल : 93.51