Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

इंधन संकटाच्या काळात LPG विक्रीत मोठी घट, पेट्रोल-डिझेलबाबत मोठी अपडेट

Fuel Crisis : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे देशात इंधन संकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी LPG, पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. या संकटाच्या काळात मे 2026 मध्ये LPG विक्रीत तब्बल 24 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे, तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत वाढ झाली आहे. पेट्रोलपेक्षा डिझेलची विक्री अधिक झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात पेट्रोल विक्रीत वार्षिक आधारावर 4.8 टक्क्यांची वाढ झाली, तर डिझेल विक्रीत 6.4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय ATF म्हणजेच विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या विक्रीतही 1.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.

ET मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या तीन सरकारी कंपन्यांचा देशातील जवळपास 90 टक्के पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन बाजारावर ताबा आहे, तर देशांतर्गत LPG बाजारात त्यांची जवळपास संपूर्ण हिस्सेदारी आहे. मात्र सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे LPG विक्रीत 24 टक्क्यांची घट झाली आहे. एप्रिल 2026 मध्येही LPG विक्रीत सुमारे 16 टक्क्यांची घट झाली होती, पण मे महिन्यात ही घसरण आणखी वाढली. तज्ज्ञांच्या मते, यामागे अनेक कारणे असू शकतात. काही क्षेत्रांमध्ये ग्राहकांनी सिलिंडरच्या किंमती आणि वापर लक्षात घेऊन खरेदी कमी केली असावी. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत मागणीचा आधार जास्त असल्याने घसरणीची टक्केवारी अधिक मोठी दिसत आहे.

हेही वाचा –  विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का, किंग कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, रोहित शर्मा,हार्दिक पांड्याबाबत नवी अपडेट

गेल्या काही दिवसांमध्ये इंधनाच्या किमतीत वाढ झालेली आहे. असं असलं तरी पेट्रोल आणि डिझेल विक्रीत वाढ नोंदवली गेली आहे. उन्हाळ्याच्या काळात वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रात पेट्रोलचा वापर वाढला आहे. दुचाकी वाहनांमध्येही पेट्रोलचा वापर अधिक झाला आहे. डिझेलच्या मागणीत 6.4 टक्क्यांची वाढ झाल्याने बाजारातील तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. भारतात साधारणपणे डिझेलचा वापर पेट्रोलपेक्षा अडीच पट अधिक असतो, त्यामुळे त्यात एवढी मोठी वाढ होणे असामान्य मानले जात आहे.

डिझेल विक्री वाढण्यामागे खासगी इंधन विक्रेत्यांकडून ग्राहकांचा सरकारी पेट्रोल पंपांकडे वाढलेला कल हेही एक मोठे कारण मानले जात आहे. अनेक भागांत घाऊक डिझेल ग्राहकांनी कमी किमतीचा फायदा घेण्यासाठी सरकारी रिटेल पंपांवरून खरेदी केली आहे. तसेच पेट्रोलचे दर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पेट्रोलचीही जास्त खरेदी झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button