#CoronaVirus | 1 ते 24 एप्रिलदरम्यान सेन्सेक्स 11% वधारला

नवी दिल्ली | देशव्यापी टाळेबंदीत एप्रिलच्या महिन्यात १ ते २४ तारखेदरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी केवळ ११% बळकट राहिला आहे. मात्र, बीएसईच्या स्मॉल कॅप इंडेक्सच्या ७० समभाग असे आहेत, ज्यांच्यात ५०% पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली. यापैकी चार समभाागांत १०० ते १५४% पर्यंत वाढ नाेंदली आहे. यामध्ये इराॅस इंटरनॅशनल मीडिया, आंध्रा बँक क्वालिटी आणि जेएमटी आॅटाेच्या समभागांचा समावेश आहे.
विश्लेषक काेराेना काळातील वेगवान चढ-उतारात गुंतवणूकदारांना समभागांच्या खरेदी-विक्रीत सतर्कता अंगीकारण्याचा सल्ला देत आहेत. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारच्या प्राेत्साहन पॅकेजच्या अपेक्षेमुळे बाजारात तेजी दिसली. दुसरीकडे, यादरम्यान बीएसई स्मॉलकॅप इंडेक्समध्ये ९.९८% आणि बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये केवळ ८.३०% ची वाढ दिसली. ही माहिती डेटा फर्म एस इक्विटीच्या एका विश्लेषणात समाेर आली आहे. त्यानुसार, ज्या समभागांमध्ये ५०% जास्त तेजी पाहायला मिळाली, त्यात शोभा, इंडिया बुल्स रिअल इस्टेट, शिल्पा मेडिकेअर, झेन टेक्नॉलॉजीज, डीएचएफएल, ज्युबिलेंट लाइफ सायन्सेस, कॉक्स अँड किंग्ज, विष्णू केमिकल, एचसीएल इन्फोसिस्टिम, मोर्पेन लॅबोरेटरीजसारख्या समभागांचा समावेश आहे.कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील तेजीमुळे बुधवारी आशिया आणि युरोपच्या बाजारांत तेजी दिसली. भारतीय शेअर बाजारावर याचा परिणाम दिसला. बीएसई सेन्सेक्स ६०५.५४ अंक(१.८९%) वाढीसह ३२,७२०.१६ वर बंद झाला. एनएसई निफ्टीत १७२.४५ अंक(१.८४%) वाढ राहिली. हा ९,५५३.३५ च्या पातळीवर बंद झाला. हा सहा आठवड्यांतील उच्चांक स्तर आहे. याआधी १३ मार्चला सेन्सेक्स ३४,१०३.४८ आणि निफ्टी ९,९५५.२० च्या पातळीवर बंद झाला होता.




