breaking-newsताज्या घडामोडीव्यापार
सोने ६ महिन्यांत १० हजाराने वाढले…
मुंबई | कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आणि गेल्या काही वर्षात सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. आज सोने पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहचल्याचे दिसून आले. मागील सहा महिन्यांत सोने १० हजाराने वाढले आहे. २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ४ हजार ७८२ तर २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ४९०२ हजार आहे. मुंबईत आज २२ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ४९ हजार २० तर २४ कॅरेट एका तोळ्याची किंमत ४८ हजार ५२० रुपये होते.या वर्षाच्या सुरुवातीस एक तोळा सोन्याचे दर ३९ हजार रुपये होते जे आतापर्यंत ४९,५०० च्या विक्रमी पातळीवर गेले आहेत. वायदा बाजारात सध्या सोन्याचे दर ४९ हजारांच्या पातळीवर आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.