breaking-newsताज्या घडामोडीव्यापार
रेल्वेच्या ६३ हजार रिक्त जागांसाठी जवळपास १ कोटी ८९ लाख अर्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-60.png)
‘रेल्वेच्या ६३ हजार रिक्त जागांसाठी जवळपास १ कोटी ८९ लाख अर्ज आले आले आहेत. या जागांसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक प्रक्रियेत आहे.’, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.
पियूष गोयल यांनी बुधवारी लोकसभेत हनुमान बेनीवाल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘रेल्वेमध्ये लेव्हल-१ अंतर्गत भरतीसाठी दोन अधिसूचना जारी केल्या होत्या. पहिली अधिसूचना फेब्रुवारी २०१८ मध्ये ६३ हजार रिक्त जागांसाठी करण्यात आली होती. तर दुसरी अधिसूचना मार्च २०१९ मध्ये १ लाख ३ हजार रिक्त जागांसाठी करण्यात आली होती. पहिल्या अधिसूचनेसाठी जवळपास १ कोटी ८९ लाख अर्ज आले आहेत.’ ऐवढ्या उमेदवारांच्या परीक्षा घेणे हे रेल्वेसमोर मोठे आव्हान असणार आहे.