breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

देशात चीनविरोधी वातावरण असतानाही एमजी मोटर्स करणार १ हजार कोटींची गुंतवणूक

काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षानंतर देशभरातून चीनविरोधी भावना जोर धरू लागली होती. अनेकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

दोन्ही देशांमधील सीमेवरील तणाव अद्यापही निवळलेला नाही. परंतु असं असलं तरी चीनची ऑटो कंपनी SAIC मोटर्सचे भारतीय युनिट एमजी मोटर्सनं पुढील वर्षभरात भारतात १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या क्षमतेचा विस्तार करण्यासाठी ही गुंतवणूक केली जाणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button