breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

घसरणीनंतर शेअर बाजार सावरला, निर्देशांक, निफ्टीत जोरदार तेजी

मुंबई – कोरोनाच्या भीतीमुळे काल झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजार पुन्हा सावरला. ट्रेडिंगच्या आजच्या आठवड्यातील शेवटच्या दिवशी बाजारात खरेदीचा जोर वाढल्यामुळे बाजारात तेजी आली होती. त्यामुळे निर्देशांक ७९७ तर निफ्टीत २२८ अंकांची वाढ झाली होती. त्यामुळे निफ्टीने आज पुन्हा ११ हजाराचा टप्पा ओलांडला होता.

आज आठवड्याच्या ट्रेडिंगच्या शेवटच्या दिवशी बाजारात गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. त्यात बँकिंग, आयटी, फार्मा आणि एफएमजीसी या सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांचा समावेश होता. आज बँक निफ्टी ४०० अंकानी वाढला होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमध्येही जोरदार खरेदी झाली. त्यामुळे बाजारात एकंदर तेजीचे वातावरण होते. त्यात बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट या कंपन्यांच्या समभागांमध्ये ४ ते ६ टक्क्यांची वाढ झाली होती. तेजीचा या बाजारात बीपीसीएल, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या समभागांमध्ये घसरण झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button