Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा आणि निवृत्तीवेतनधारकांचा देय महागाई भत्ता सध्या स्थगित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-125.png)
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना 1 जानेवारी २०२० पासून देय असलेला महागाई भत्ता सध्या देण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे…
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची अतिरिक्त देय रक्कम आणि केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना महागाई मदत सध्या मिळणार नाही. एक जानेवारी २०२० पासून देय असलेली ही रक्कम सध्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नाही.
त्याचबरोबर 1 जुलै २०२० आणि 1 जानेवारी २०२१ पासून देय असलेली महागाई भत्त्याची अतिरिक्त देय रक्कमही येत्या काळात देण्यात येणार नसल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.