आर्थिक संकटामुळे अनेकांचा कल घरपोच मासे आणि भाजी विक्रीकडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Untitled-19.png)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसर राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं. अनलॉक प्रोसेसमध्ये आता काही प्रमाणात का होईना अटी-नियम लागू करून बऱ्याच गोष्टी शिथिल करण्यात आल्या आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावं लागलं. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं. त्यामुळे रोजगाराचा पर्याय शोधत मागील २ महिन्यात बहुतेक जणांनी घरपोच मासे आणि भाजी विक्री सुरू केली आहे.
मासेविक्री करत अनेकांनी धीर सोडला असून, ओळखीच्या व्यक्तीकडून घरपोच मासे मिळत असल्यानं त्याला प्रतिसाद ही चांगाला मिळत आहे. लॉकडाऊनमुळं अनेकांचे रोजगार कपात करण्यात आले. स्वतंत्र व्यावसायिकांचे व्यवसाय खंडित झाले. यावर उपाय म्हणून काहींनी घरपोच मासे, भाजी विक्री व्यवसाय हाती घेतला आहे.
मासे आणण्यासाठी मासळी बाजारात जाणे किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर मासे मिळायचे. मात्र टाळेबंदीत हे प्रमाण जवळपास बंदच झालं. तर गल्लीच्या कोपऱ्यावरील मासे विक्री मर्यादित होऊ लागली. या व्यवसायातील ही कमतरता अनेकांना सध्या उपलब्ध झाल्याचे यातून दिसून येत आहे.