breaking-newsआंतरराष्टीय

#Lockdown:बिहारच्या ज्योती कुमारचं इवांका ट्रम्पकडून कौतुक

मुंबई : लॉकडाऊनमध्ये आपल्या वडिलांना गुरूग्रामवरून सायकलवर बसवून बिहारच्या दरभंगा परिसरात घेऊन येणाऱ्या ज्योतीने सगळ्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. ज्योतीने लॉकडाऊनमध्ये आपल्या वडिलांना परत . ज्योतीची सगळीकडेच चर्चा होत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पने ज्योतीचं ट्विटरवरून कौतुक केलं आहे. 

इवांकाने ज्योतीच्या शूरपणाचं कौतुक केलं आहे. अवघ्या १५ वर्षांची ज्योती कुमारी आपल्या जखमी वडिलांना सात दिवस १,२०० किमीचा प्रवास करून गावी घेऊन आली. सहनशक्ती आणि व़डिलांप्रती असलेल्या प्रेमापोटी ज्योतीने सगळ्यांच लक्षकेंद्रीत केलं आहे. सायकलिग फेडरेशन ऑफ इंडियाकडून देखील कौतुक. 

ज्योतीचा विश्वास आणि तिची इच्छाशक्तीचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून देखील ज्योतीला एक लाख रुपयाची मदत करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button