Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीय

इस्रायलचा इराणच्या राजधानीवर हल्ला; इराणमध्ये आणीबाणी जाहीर

Israel launched attack on Tehran | अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. असोसिएटेड प्रेस (एपी)च्या वृत्तानुसार, तेहरानमध्ये मोठा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून त्यानंतर इराणने देशभरात आणीबाणी जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. ८६ वर्षीय खामेनी हल्ल्यावेळी कार्यालयात होते की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. या घटनेनंतर इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.

हेही वाचा     :            दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवालांसह सिसोदियांची निर्दोष मुक्तता

इस्रायल आणि अमेरिकेने हा प्रतिबंधात्मक क्षेपणास्त्र हल्ला असल्याचा दावा केला आहे. इराणकडून निर्माण झालेल्या संभाव्य धोक्याला निष्प्रभ करण्यासाठी ही कारवाई केल्याचे इस्रायलने स्पष्ट केले. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी दिलेल्या निवेदनात, “इराणकडून निर्माण झालेल्या धोक्यांमुळे आगाऊ पाऊल उचलण्यात आले,” असे म्हटले आहे. तसेच हा हल्ला अमेरिकेशी समन्वय साधून करण्यात आल्याची माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी तीव्र झाला असून पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाची भीती व्यक्त केली जात आहे. इराण आणि अमेरिकेदरम्यान राजनैतिक तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button