खाना-खजाना : ‘‘व्हेजिटेबल टोस्ट’’ कसे बनवाल घरच्या घरी?
श्रावण आहे… मग, मांसाहार करण्याचे मन नाही. तर चला मग, खमंग…व्हेजिटेबल टोस्ट… आणि तेही घरच्या घरी कसे करता येतील? अगदी सोप्या पद्धतीने.
साहित्य : एक मोठा कांदा, एक उकडलेला बटाटा, एक गाजर, पाव वाटी बारीक चिरलेला कोबी, पाव वाटी मटार, एक टोमॅटो, चार हिरव्या मिरच्या, २/३ आले-तुकडे, ४/५ सोललेल्या लसूण पाकळ्या, कोथिंबीर, बटर, ब्रेड, तेल, मीठ.
कृती : कांदा, गाजर, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. मटार ठेचून घ्या. बटाटा उकडून स्मॅश करावा. लसूण, मिरच्या, आले, मीठ एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्यावे.
तेल गरम करून त्यात सर्व चिरलेल्या भाज्या एकत्र करून घालून खमंग परतावे. मिक्सरमधून काढलेला मसाला त्यात घालावा परतावे. नंतर बटाटा घालावा. खमंग परतावे. एकत्रित मिसळून घ्यावे मिश्रण करून ठेवावे. गार होऊ द्यावे.नंतर ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढाव्यात. एका स्लाइसवर वरील भाजीचे मिश्रण घालावे. त्यावर दुसरा स्लाइस ठेवून हलके दाबून बसवावा. निर्लेप तव्यावर बटर घालून हे स्लाइस खमंग परतून घ्यावेत. मुलांच्या शाळेच्या डब्याला देता येतात. सर्वांना आवडतील असेच होतात. चटणी, सॉसबरोबर खायला द्यावे.