breaking-newsआंतरराष्टीय

#CovidVaccine: वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस येऊ शकते : डब्ल्यूएचओ

लंडन : जागतिक आरोग्य संघटनेतील मुख्य संशोधक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी गुरुवारी बोलताना सांगितले की, या वर्षा अखेरीस कोरोना व्हायरसवर प्रभावी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसवर उपचारासाठी प्रभावी लस तयार करण्यासाठी सुरु असणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांच्या दृष्टीने जिनेवा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्मामीनाथन म्हणाल्या की,

‘आतापर्यंत कोरोना रोखण्यासाठी प्रभावी समजलं जाणारं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध, कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मृत्यूपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी नसल्याचं निष्पन्न झालं आहे.’

भविष्यात या जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रभावी लस तयार करण्यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, ‘सुमारे दहा उमेदवार मानवी चाचणी टप्प्यात असून त्यापैकी तीन उमेदवार नवीन टप्प्यात प्रवेश करत आहेत. त्यामुळे ही लस प्रभावी ठरत असल्याचं सिद्ध होत आहे.’

प्रभावी औषधाबाबत डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांचा उल्लेख करत स्वामीनाथन पुढे म्हणाले की, ‘मी आशा करते. मी आशावादी आहे. परंतु, लस विकसित करण्यासाठी एक अत्यंत किचकट प्रक्रिया असते आणि यामध्ये अत्यंत अनिश्चितताही असते. चांगली गोष्ट म्हणजे, आपल्याकडे अनेक वेगवेगळे उमेदवार आहेत, तसेच अनेक प्लॅटफॉर्मही आहेत.’

पुढे बोलताना त्या म्हणाले की, ‘जर आपण भाग्यवान असू तर, या वर्षा अखेरपर्यंत एक किंवा दोन प्रभावी उमेदवार असतील.’ तसेच डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचं असंही म्हणणं आहे की, लोकांना कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडण्यापासून वाचवण्यासाठी मलेरियावर प्रभावी ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची भूमिका असू शकते. यावर सध्या क्लिनिकल परिक्षण सुरु आहेत. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘अद्याप कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन नेमकं कोणती आणि काय भूमिका बजावतं हे स्पष्ट झालेलं नाही. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या इतर परिक्षणांसंदर्भात बोलताना सांगितले की, ‘आम्हाला आतापर्यंत हे माहिती नाही, त्यामुळे मोठ्या स्तरावर परिक्षणं पूर्ण करणं आणि आकडे मिळवण्याची गरज आहे.’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button