#CoronaVirus: आमदार निवासात करोनाग्रस्तांना ठेवण्यास विरोध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/nagpur.jpg)
नागपूर | महाईन्यूज
शहरातील करोनाग्रस्तांना सिव्हिल लाईनमधील आमदार निवास येथे ठेवण्याची व्यवस्था के ली जात आहे. त्या ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार के ला जात आहे. परंतु परिसरातील नागरिकांनी या कक्षाला विरोध केला असून आमचा जीव धोक्?यात घालू नका, शहराबाहेर उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्या, अशी विनंती जिल्हाधिकारी यांना केली आहे.
करोनाग्रस्तांसाठी आमदार निवास रिकामे करण्यात आले आहे. येथील १८० खोल्या ताब्यात घेण्यात आल्या असून तेथे स्वच्छतेच्या दृष्टीने लगबग सुरू झाली आहे. या खोल्यांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत चालला आहे. त्यातच सिव्हिल लाईन परिसरात विलगीकरण कक्ष उघडण्यात येत असल्याने परिसरात राहणारे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. सध्या सुरक्षित असलेल्या सिव्हिल लाईन परिसरात विलगीकरण कक्ष उघडून करोनाला कशाला आमंत्रण देता, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आज शुक्रवारी दुपारी नगरसेविका प्रगती पाटील, काँग्रेसचे प्रदेश संयोजक पवन मोरे, रणधीर नशिने, ओमप्रकाश शिरपूरकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेतली. सिव्हिल लाईन परिसरात शासकीय कार्यालये व अधिकाऱ्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांची संख्यासुद्धा मोठी आहे. आमदार निवासात उघडण्यात येणाऱ्या विलगीकरण कक्षामुळे इतरांनाही बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विलगीकरण कक्ष शहराबाहेर उघडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी विलगीकरण कक्ष अतिशय सुरक्षित असून करोनाचा प्रसार होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात येईल, असे शिष्टमंडळाला सांगितले.