breaking-newsराष्ट्रिय

#CoronaVirus:नव्या टेस्ट किटमुळे अवघ्या २० मिनिटात

नवी दिल्ली : कोरोना वायरसने देशासह आणि जगभरात थैमान घातलंय. कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही. अशावेळी जास्तीत जास्त चाचणी करुन कोरोना रुग्णांची ओळख पटवणे हे आरोग्य कर्मचाऱ्यांसमोरचे मोठे काम आहे. यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. जास्तीत जास्त चाचण्या झाल्या तर कोरोनाचे संक्रमण रोखणे सोपे होणार आहे. या चाचणीच्या अहवालासाठी प्रसंगी ४ ते ८ दिवसांचा अवधीही लागत होता. पण आता या संदर्भात महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. 

या टेस्टला पीसीआर टेस्ट असे म्हटले जाते. ही चाचणी आधीच्या सर्व चाचण्यांपेक्षा वेगळी आहे. यामुळे खूपच लवकर निकाल मिळतो. रुग्णांना आयसोलेट करणे देखील सोपे होते. 

ब्रिटनमध्ये कोरोना वायरस संक्रमणावर एक किट तयार केलंय. याचा रिपोर्ट अवघ्या २० मिनिटांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे त्याच क्षणी मिळणार रुग्णाची ओळख पटवणे सोपे होणार आहे. यूकेचे आरोग्यमंत्री मैट हॅनकॉक यांनी या किट संदर्भात माहिती दिली. 

कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण कळण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागायचा. पण आता असे होणार नाही. ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून कमी वेळेत निकाल देणाऱ्या टेस्टिंग सुरु होतील अशी माहीती हॅनकॉक यांनी दिली. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button