breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:आठवड्यात 3 दिवस सुट्टी द्या, न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी सूचवला कंपन्यांना पर्याय

नवी दिल्ली : कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर न्यूझीलंड पुन्हा रुळावर धावण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यांनी कंपन्यांना कामाचा आठवडा 4 दिवसांचा करण्याबाबत सुचवलं आहे. जसिंडा म्हणतात की यामुळे पर्यटनाला चालना मिळेल तसेच कामकाजात लवचिकता आल्यामुळे उत्पादकता वाढेल. या व्यतिरिक्त, वर्क लाईफ देखील बॅलेन्स राहिल.

पंतप्रधान जसिंडा यांनी एका फेसबुक लाइव्ह व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, देशभरातून अनेक लोक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि स्वदेशी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सूचना घेऊन आले होते. लोकांचं म्हणणं आहे की 4 दिवसांचा कार्य आठवडा असावा. कंपन्यांच्या मालकांनी याचा विचार करावा. याचा देशाला मोठा फायदा होईल.

पंतप्रधान जसिंडा यांच्या या अनौपचारिक भाषणामुळे न्यूझीलंडमधील लोक उत्साही आहेत. जसिंडा यांनी म्हटलं की, बर्‍याच न्यूझीलंडच्या लोकांचे म्हणणे आहे की, जर कामाच्या बाबतीत अधिक लवचिकता आली तर स्थानिक प्रवास करता येईल. कोरोनामुळे देशाच्या पर्यटन व्यवसायात मोठी घसरण झाली आहे. तसेच इतर देशातील नागरिकांसाठी देशाच्या सर्व सीमा बंद आहेत. त्यामुळे पर्यटनातून येणार महसूल सध्या बंद आहे.

मी बर्‍याच लोकांना चार दिवसांचा वर्कवीक असावा असा सुचवताना पाहिलं आहे. आम्ही कोरोना विषाणूपासून बरेच काही शिकलो आहोत आणि जे लोकं घरून काम करतात ते देखील चांगलं आऊटपूट देत आहेत.’

जसिंडा म्हणतात की, ‘जर लोकांना याबद्दल विचार करण्यास खरोखर प्रोत्साहित करते. तुम्ही मालक असाल आणि तसे करण्याच्या स्थितीत असाल तर या मार्गाने निश्चितच संपूर्ण देशातील पर्यटनास मदत होईल.

गार्डयनचे संस्थापक बार्न्स यांनी 2018 मध्येच चार दिवसांचा वर्क वीक केला होता. त्यांच्याकडे 200 पेक्षा जास्त लोक काम करतात. यामुळे बार्न्स यांना असे दिसून आले की कर्मचारी या बदलामुळे अधिक खूष आहेत आणि ते अधिक चांगलं काम करत आहेत. तसेच, यामुळे त्यांचे कर्मचारी अधिक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगीही आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button