Corona Update: देशातील 95 लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 95.40 टक्के,
![corona update 95 lakh patient discharge in all over India](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/caught-in-corona-crossfire-how-the-current-crisis-has-vilified-the-c-word-and-a-mexican-beer-all-at-once-3.jpg)
देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. मागील 24 तासांत देशभरात 31 हजार 087 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 95.20 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, देशाचा कोरोना रिकव्हरी रेट 95.40 टक्के एवढा झाला आहे.
मागील 24 तासांत देशभरात 22 हजार 889 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 99 लाख 79 हजार 447 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 3 लाख 13 हजार 831 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात 338 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 44 हजार 789 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे. आजवर देशात 15 कोटी 89 लाख 18 हजार 646 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी गुरुवारी (दि.17) 11 लाख 13 हजार 406 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या देखील घटली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत निरंतर घट होताना दिसत आहे.