breaking-newsराष्ट्रिय

2009 पासूनच सुरु होते दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन; मुख्य सूत्रधाराची कबुली

देशाच्या राजधानीत आत्मघातकी हल्ले आणि बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक झालेल्या आयसिसच्या हस्तकांच्या म्होरक्याच्या चौकशीतून नवी माहिती उघड झाली आहे. 2009 पासूनच दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करत होतो, अशी कबुली मुख्य सूत्रधार मुफ्ती सुहेल याने पोलीस चौकशीत दिली आहे.

दिल्लीसह उत्तर भारताच्या इतर भागांमध्ये राजकीय नेते आणि सरकारी आस्थापनांमध्ये घातपाती कृत्ये करण्याचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गेल्या आठवड्यात काही तरुणांना अटक केली होती. मुफ्ती मोहम्मद सुहैल ऊर्फ हजरत (२९), अनास युनूस (२४), रशीद झफर राक ऊर्फ झफर (२३), सईद ऊर्फ सय्यद (२८), त्याचा भाऊ रईस अहमद, झुबैर मलिक (२०), त्याचा भाऊ झैद (२२), साकिब इफ्तेखार (२६), मोहम्मद इर्शाद (२०) आणि मोहम्मद आझम (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे होती. यातील मुफ्ती सुहैल हा त्यांचा म्होरक्या असून हरकत- उल- हर्ब- ए- इस्लाम असे या दहशतवादी संघटनेचे नाव आहे. ही संघटना आयसिसशी संबंधित आहे.

सुहैल हा 29 वर्षांचा असून तो कट्टरतावाद्यांच्या संपर्कात आला होता. भारतातील मुस्लिमांवर अन्याय होत आहे, अशी भावना त्याच्या मनात होती. बाबरी मशिद पाडल्याने मुस्लिमांवर अन्याय झाला. मुस्लिमांसोबत भेदभाव केला जातो आणि यामुळे मुस्लिम तरुणांना नोकरी मिळत नाही, असे सुहैलला वाटायचे. यामुळेच सुहेल दहशतवादी संघटनेत सामील झाला.  सुरुवातीला सुहैल अल- कायदा आणि तालिबान या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी इच्छुक होता. पण त्या संघटनांशी त्याला संपर्क साधता आला नाही. सुहैब हा ऑनलाइनच दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. यानंतर त्याने आयसिसचे समर्थन करणारी संघटना सुरु केली, अशी माहितीही चौकशीतून समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button