breaking-newsआंतरराष्टीय

९० दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करण्याचा डोनाल्ड ट्रम्पचा आदेश

न्यूयॉर्क – काही दिवसांपूर्वी अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घातली होती. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्सला ९० दिवसांत अमेरिकेतील टिकटॉकची संपत्ती विकण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपन्यांविरोधात आपली कठोर भूमिका अद्याप कायम ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.

चिनी कंपनी बाईटडान्स असे काही काम करू शकते ज्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे, असे ट्रम्प यांनी यावेळी नमूद केले. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. तसेच अर्थव्यवस्था. परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला हे अॅप धोकादायक असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भारताने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकसह आणखी काही चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर अन्य काही देशांमधूनही तसाच सूर उमटू लागला होता. अमेरिकेनेही सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button