हैदराबाद सोडून निजाम कुठेही पळाले नाहीत, योगींना ओवेसींचं प्रत्युत्तर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/yogi-owaisi.jpg)
तेलंगणातील प्रचारसभेत योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तेलंगणातील विकराबादमधील तंदूर विधासभा मतदारसंघातील एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी भाजपा सत्तेत आल्यास ज्याप्रमाणे निजामाला हैदराबाद सोडून पळ काढावा लागला त्याप्रमाणे असदुद्दीन ओवेसी यांनाही हैदराबादमधून पळ काढावा लागेल, असे विधान केले होते.
‘तारीख तर तुम्हाला माहिती नाहीये…इतिहासात तुमचं ज्ञान शून्य आहे. वाचता येत नसेल तर किमान वाचता येणाऱ्यांना विचारत जा. वाचता आलं असतं तर माहित झाले असते की निजाम हैदराबाद सोडून कोठेही गेले नाही. त्यांना राजप्रमुख करण्यात आले होते. चीनसोबत लढाई झाली तेव्हा निजामाने येथेच आपले सोने विकले होते’, असे म्हणत ओवेसी यांनी योगींवर पलटवार केला.
‘हा देश तुमचा आहे…माझा नाही? भाजपाविरोधात बोलल्यास, मोदीविरोधात बोलल्यास किंवा टीका केल्यास देशातून पळवून लावणार का ? असा सवालही त्यांनी यावेळी योगींना केला. याशिवाय, योगींच्या गोरखपूरमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णालयात लहान बाळांचे मृत्यू होतात. तुम्हाला तिथली काळजी नाहीये आणि येथे आला आहात…येथे येऊ द्वेषाचं राजकारण करत आहात अशी टीका ओवेसींनी केली.