Breaking-news
‘हे’ केवळ पाकिस्तान किंवा हुकूमशाहीतच घडू शकते- राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/chidambaram-696x392-1.jpg)
रायपूर : सध्या देशाच्या राज्यघटनेवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशातील स्वायत्त संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे केवळ पाकिस्तान किंवा हुकूमशाहीतच घडू शकते, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.
छत्तीसगढमधील जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्नाटकमधील आमदारांच्या पळवापळवीच्या राजकारणावर टीका केली. कर्नाटकमध्ये एका बाजूला आमदार आणि दुसरीकडे राज्यपाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपामध्ये येण्यासाठी जेडीएसच्या प्रत्येक आमदारासमोर 100 कोटी रूपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे राहुल यांनी सांगितले.